22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईनंतर आता पुण्यातही मराठी पाट्या

मुंबईनंतर आता पुण्यातही मराठी पाट्या

पाट्या मराठीत करण्याचे महापालिकेचे आदेश

पुणे : दुकाने आणि विविध अस्थापनांच्या पाट्यांचा विषयाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही दुकाने आणि विविध अस्थापनांच्या पाट्या मराठी बघायला मिळणार आहे. पुणे महापालिकेने दुकाने आणि अस्थापनांवरील पाट्या आदेश काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न करणा-यांवर कारवाई होणार, असा इशारा महापालिकेने व्यावसायिकांना दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानिक भाषेत करावेत, असे आदेश दिले होते. त्याची मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मुंबईतील अनेक परिसरातील इंग्रजी पाट्या हटवून मराठी पाट्या लावण्यात आल्या. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सगळ्यांना आवाहन केले. त्यानंतर ज्या ठिकाणी इंग्रजी पाट्या दिसल्या त्याठिकाणी आंदोलन केले होते. हेच पाहून मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातीलही दुकाने आणि अस्थापनांच्या पाट्या मराठीमध्ये करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांकडे केली होती. तसेच, न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करर्णा­यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

याच मागणीला आता यश आले आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने मराठी पाट्या संदर्भातले आदेश काढले आहे. या संदर्भातील सगळी माहिती प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. आणि अंमलबजावणी न करर्णा­यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.

मराठी पाट्या लावण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
कोर्ट कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा, अशी कानउघडणी करत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत मुंबईसह राज्यभरातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या दिसण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR