30.3 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

मुंबई – आज सकाळी पहिल्यांदा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली. ठाकरे यांच्या भेटीनंतर काही वेळातच ‘वर्षा’ बंगल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटी घेतली आहे. या भेटीचे कारण अजूनही समोर आलेले नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आज मुख्यमंत्री शिंदे यांची पाठोपाठ दोन बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे.

खासदार शरद पवार या भेटीत मराठा आरक्षणासह राज्यातील अन्य विषयांवर चर्चा करतील असे बोलले जात आहे. शरद पवार दुपारी २ वाजता ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीत मराठा आरक्षणासह विविध मुद्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आठवडाभरात ही दुसरी भेट आहे. याआधी २२ जुलैला भेट घेतली होती.

शरद पवार यांनी २२ जुलै रोजी घेतलेल्या भेटीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय होता. यासोबतच दूध दराचाही प्रश्न, विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला कर्ज न देणे हा विषय होता. शरद पवार यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीत कुणाच्याही कारखान्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले होते. दरम्यान, आता आजची भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे याची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR