22.9 C
Latur
Monday, December 30, 2024
Homeमहाराष्ट्रतणावानंतर धारावीत अनधिकृत मशिद हटवण्याचे काम सुरू

तणावानंतर धारावीत अनधिकृत मशिद हटवण्याचे काम सुरू

मुंबई : प्र्रतिनिधी
धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मस्जिदचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात झाली असून मेहबूब-ए-सुबानिया मशिद ट्रस्टकडूनच ही मस्जिद हटवण्याचे काम सुरू आहे. सुरूवातीला महापालिकेकडून मशिद हटवण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. अनधिकृत मस्जिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला. या घटनेने धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मस्जिद अनधिकृत बांधकाम प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायायलयाच्या आदेशानंतर ट्रस्टने मस्जिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत सोमवारी ३० सप्टेंबर रोजी मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील धारावी येथे असलेली मेहबूब-ए-सुबानिया मस्जिद ६० वर्षांहून अधिक जुनी आहे. या मस्जिदीला दोन वर्षांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणात कोणताही तोडगा निघाला नाही. जेव्हा ही मस्जिद बांधली गेली तेव्हा तिला ग्राउंड प्लस २ मजले होते. वाढत्या लोकसंख्येमुळे मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एक मजला वाढवण्यात आला होता. मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीचे पथक आल्यावर गोंधळ झाला. हजारोंचा जनसमुदाय जमला. मस्जिद पाडण्यावरून मोठा गोंधळही झाला.

मशिदीबद्दल फडणवीसांची प्रतिक्रिया?
याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य आले आहे. हा न्यायालयाचा निर्णय आहे, असे ते म्हणाले होते. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मला विश्वास आहे की मस्जिद समितीने बीएमसीला ज्या प्रकारे आश्वासन दिले आहे, त्याच पद्धतीने पुढील कारवाई केली जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR