25.2 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeउद्योगअदानी समूहाविरुद्ध अमेरिकेत चौकशी

अदानी समूहाविरुद्ध अमेरिकेत चौकशी

नवी दिल्ली : अदानी समूह आणि त्याच्या संस्थापकाची लाचखोरीप्रकरणी अमेरिका चौकशी करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांच्या वर्तनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे. आणि कंपनी लाचखोरीत सहभागी होती का?, याची चौकशी सुरु आहे. हे संपूर्ण प्रकरण एका ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

अदानी समूहाच्या कोणत्याही युनिटने किंवा कंपनीशी संबंधित असलेल्या लोकांनी ज्यामध्ये स्वत: गौतम अदानी यांचा समावेश आहे. हा ऊर्जा प्रकल्प घेण्यासाठी भारतातील अधिका-यांना पैसे दिले होते का?, याचा तपास अमेरिकन अधिकारी करत आहेत. ऊर्जा कंपनी अझर पॉवर ग्लोबल देखील तपासात सामील आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले. न्यूयॉर्कचे वकील आणि वॉश्ािंग्टनमधील न्याय विभागाच्या फसवणूक युनिटद्वारे तपास केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR