29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्रखैरे म्हणाले, ‘माझ्या नशिबात लोकसभा आहे!’

खैरे म्हणाले, ‘माझ्या नशिबात लोकसभा आहे!’

छत्रपती संभाजीनगर : मागच्या वेळी माझ्या नशिबात लोकसभा होती, परंतु डावपेच आखून मला दूर ठेवले गेले. यावेळीही अनेक ज्योतिषी आणि पंडितांनी नशिबात लोकसभा असल्याचे सांगितले आहे, असे सांगत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

चंद्रकांत खैरेंमुळे दहा वर्षांपासून मी लोकसभेसाठी दूर राहिलो, यावेळी आपल्याला पक्षाने तिकिट द्यावे, अशी मागणी विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यावर चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय की, मी गुरु असून ते माझे शिष्य आहेत. गुरु काही डाव हातचे ठेवत असतात.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे
अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. ही मोठी पोस्ट आहे. त्यांनी लोकसभेला उभे राहू नये, असा सल्ला मी दिला नाही. परंतु पक्षाने यावेळी मला संधी द्यावी, अशी माझी मागणी आहे. मला शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, तुझ्या नशिबात असेल तर द्यावे लागेल आणि नशिबात नसेल नाही द्यावे लागणार.

खैरेंचा डावलण्याचा प्रयत्न : दानवे
‘मला श्ािंदेंकडे जायचे असते तर मी तेव्हाच गेलो असतो. मी श्ािंदे गटात नाही, शिंदे गट पाच ते सहा महिने राहणार आहे. इच्छा व्यक्त करणे आपला अधिकार आहे. काही गोष्टी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्या आहेत. दुसरी बाजू मांडणे गरजेचे होते. चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलण्याचा प्रयत्न करतात. पण, मी उद्धव ठाकरेंसाठी काम करतो. त्यामुळे खैरे काय करतात याबाबत मला देणं-घेणं नाही, असे अंबादास दानवे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR