40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

संजय राऊत यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत कायम चर्चेत असतात. त्यांच्या टोकाच्या विधानांमुळे नेहमीच नवनवे वाद निर्माण होत असतात. त्यातच आता आणखी एक विधान त्यांना अडचणीत टाकणारे ठरत आहे.

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. शिवाय संजय राऊत हे देखील असेच बोलले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी करुन समाजातील मोठ्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी संजय राऊतांना नोटीस येऊ शकते आणि त्यांची चौकशीदेखील होऊ शकते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही मोदी-शाह यांच्याबाबत असेच विधान केलेले आहे.

बुधवारी सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी चौफेर टीकास्र सोडले होते. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, परंतु त्यांना केवळ गुजरातबद्दल प्रेम आहे. एकामागून एक प्रकल्प गुजरातला नेल्याचा उद्धव ठाकरेंनी आरोप केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. पण औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोत येथे झाला. त्यामुळेच मोदी-शाह यांच्यात औरंगजेबी वृत्ती आहे. त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे आणि मराठी माणूस संपवायचा आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला होता.

हा देशद्रोह आहे : मुख्यमंत्री श्ािंदे
उद्धव ठाकरेंच्या आरोपांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधानांबद्दल अशा पद्धतीची विधाने करणे चुकीचे आहे. औरंगजेबाने महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का दिला होता, अशा व्यक्तीची तुलना पंतप्रधानांशी करणे दुर्दैवी आहे, हा देशद्रोह आहे, असे एकनाथ श्ािंदे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR