40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीय‘एआय’ने शोधून दिला परफेक्ट लाईफ पार्टनर!

‘एआय’ने शोधून दिला परफेक्ट लाईफ पार्टनर!

मास्को : आजकाल ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) सर्वच क्षेत्रांमध्ये माणसांची मदत करत आहे. केवळ ई-मेल लिहिणं, फोटो तयार करणं एवढ्यापुरतंच ते मर्यादित राहिलेलं नाही. एका तरुणाने तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा असा वापर केला आहे, जो कदाचित चॅटजीपीटी बनवणा-या सॅम अल्टमनला देखील अपेक्षित नसावा. तरुणाने एआयच्या मदतीने परफेक्ट लाईफ पार्टनर शोधल्याचा दावा केला आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या ऍलेक्झँडर जदान या 23 वर्षीय तरुणाने ‘टिंडर’या डेटिंग साईटवर अकाउंट उघडले. त्याने या साईटवर चॅटजीपीटी आणि अन्य एआय बॉट्सचा वापर केला. सुमारे ५,००० तरुणींशी चॅटिंग केल्यानंतर त्याला मनासारखी जोडीदार मिळाली आहे.

अशी घेतली एआयची मदत
या तरुणाने सांगितलं, की त्याला हे सगळं करण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागला. तो म्हणाला, मी सुरुवातीला चॅटजीपीटीला हे सांगितलं की मी कशा प्रकारे बोलतो. या प्रोग्रामला ट्रेन करण्यासाठीच बराचसा वेळ खर्च झाला. अखेर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर या चॅटबॉटने तरुणींशी संवाद साधण्यास सुरुवात केली. यानंतर माझ्यासाठी अयोग्य असणा-या मॅचेसना हे बॉट आपोआप हटवू लागलं.

यानंतर चॅटजीपीटीने सर्व तरुणींशी संवाद साधत असतानाच, करीना इमरानोव्ना ही तरुणी सर्वात योग्य मॅच असल्याचे ऍलेक्झँडरला सांगितलं. एआय चॅटबॉटनेच या दोघांच्या भेटीसाठी डेट्स फिक्स केल्या, आणि प्रपोज करण्यासाठीही मदत केली. तुमचं नातं अगदी संतुलित आणि मजबूत आहे, त्यामुळे तू तिला प्रपोज करू शकतोस असे एआयने या तरुणाला सांगितले.

सुरळीत सुरू आहे संसार
यानंतर ऍलेक्झँडरने करीनाला प्रपोज केले. या दोघांचे लग्नही झाले, आणि आता त्यांचा संसार अगदी सुरळीत सुरू आहे. करीनाला लग्नानंतर समजले की ऍलेक्झँडर चॅटिंगसाठी एआयचा वापर करत होता. मात्र, यामुळे काही फरक पडत नसल्याचे तिने म्हटले आहे. तीदेखील ऍलेक्झँडरला आपला परफेक्ट मॅच मानते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR