21.9 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeराष्ट्रीयअयोध्येच्या सुरक्षेसाठी एआय तंत्रज्ञान वापरणार

अयोध्येच्या सुरक्षेसाठी एआय तंत्रज्ञान वापरणार

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मंगळवार दि. १६ जानेवारीपासून पूजा सुरू करण्यात आली आहे. एकीकडे प्रायश्चित पूजा सुरू झालेली असताना, दुसरीकडे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे.

२२ जानेवारीला जगभरातील व्हीआयपी लोक आणि श्रीरामभक्त अयोध्येत उपस्थित असणार आहेत. यामुळेच या पवित्र दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अयोध्येचे रुपांतर एका अभेद्य किल्ल्यात करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात एआयचा वापर करण्यात येतो आहे. अयोध्येमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी तब्बल १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच एक अँटी-ड्रोन प्रणाली याठिकाणी तैनात केली आहे, हे तंत्रज्ञान आजूबाजूला उडणारी कोणतीही अनधिकृत वस्तू टिपून, त्याचा टेकऑफ पॉइंट शोधून काढू शकते. एवढंच नाही, तर हवेतच कोणतेही ड्रोन आपल्या कंट्रोलमध्ये घेण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी माहिती दिली.

एआयचा प्रयोग
अयोध्येतील सुरक्षा व्यवस्थेमध्ये एआयचा वापरही केला जाणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. हे यशस्वी झाल्यास पुढे विविध ठिकाणी सुरक्षेसाठी एआयचा वापर केला जाईल असेही एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले आहे. राम मंदिराच्या आजूबाजूला असणारे टॅक्सीचालक, ई-रिक्षाचालक, अयोध्येतील हॉटेल कर्मचारी तसेच याठिकाणी येणा-या प्रत्येक व्यक्तीची ओळख पडताळणी करण्यात येणार आहे.

पीएसीच्या २६ तुकड्या
एका पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येमध्ये निमलष्करी दल आणि पीएसीच्या २६ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सोबतच ८०० पोलिस मित्र, यूपी अँटी टेरर स्क्वॉड, स्पेशल टास्क फोर्स टीम्स, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड याठिकाणी तैनात करण्यात येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR