34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीत अजित पवारांचा उमेदवार ठरेना

बारामतीत अजित पवारांचा उमेदवार ठरेना

पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. विद्यमान खासदार आणि शिवसेना श्ािंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची तर शिवसेना (ठाकरे गटाचे) संजोग वाघिरे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र अद्याप बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा उमेदवार जाहीर झाला नाही. मात्र यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात माजी खासदार संजय काकडे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणजेच मोहोळ यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असल्याचे दिसते. याआधी दोन इच्छुक उमेदवारांनी प्रचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तसेच काँग्रेस पक्षातील नाराज मंडळींची नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय समितीला पाचारण करण्याची वेळ आली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार बारणे हे तिस-या वेळेस खासदारकीच्या निवडणूक रिंगणात आहेत. याआधी त्यांनी सन २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळविला होता. मात्र यावेळची निवडणूक त्यापेक्षा वेगळी असणार आहे. शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळेच यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. तर यापूर्वी खासदार बारणे यांना तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबरोबर दोन वेळा लढत द्यावी लागली होती. पण यावेळची राजकीय स्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
सन २००९ मध्ये हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. त्यावेळेपासून आतापर्यंत या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. यावेळी एकूणच राजकीय स्थिती बदलली असल्याने यावेळच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR