34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाअभिषेक शर्माच्या दमदार खेळीनंतरही युवराज नाराज

अभिषेक शर्माच्या दमदार खेळीनंतरही युवराज नाराज

नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने (एसआरएच) बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी धावसंख्या उभारली आणि या मोसमात पहिला विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने ३ गडी गमावून २७७ धावांची गुढी उभारली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ ५ गडी गमावून २४६ धावांतच गारद झाला. एसआरएचच्या या विजयात युवा अभिषेक शर्माचे महत्त्वाचे योगदान होते. २३ वर्षीय अभिषेकने या सामन्यात आपल्या खेळीने सर्वांची मने जिंकली, तरीही भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग त्याच्यावर नाराज दिसला.

या सामन्यात अभिषेक शर्माने ३ -या क्रमांकावर फलंदाजीला येवून तुफान फटकेबाजी केली. त्याने २३ चेंडूत २७३.९१ च्या स्ट्राईक रेटने ६३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ७ षटकार मारले. अभिषेकने अवघ्या १६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकच्या या खेळीनंतर माजी खेळाडू युवराज सिंगने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, वाह अभिषेक सर वाह! छान खेळी केली पण आऊट होण्यासाठी किती खराब शॉटचा वापर केला. वास्तविक, तो आणखी मोठी खेळी करू शकला असता, परंतु चुकीचा फटका खेळून तो बाद झाला. यावर नाराज झालेल्या युवराज सिंगने चप्पलच्या इमोजीसह लिहिले की ‘लातों के भूत बातों से नही मानते’ चप्पल तुमची वाट पाहत आहेत अभिषेक शर्मा, असे युवराजने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहले..

अभिषेकने सर्वांत वेगवान अर्धशतक ठोकले
१६ चेंडूत अर्धशतक झळकावून अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वांत वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम ट्रॅव्हिस हेडच्या नावावर होता. याच सामन्यात अभिषेक शर्माच्या आधी फलंदाजीसाठी आलेल्या ट्रॅव्हिस हेडने १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते, मात्र अभिषेकने १६ चेंडूत अर्धशतक ठोकून हेडला मागे टाकले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR