40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूररमजाननिमित्त खरेदीची लगबग; यंदा बाजारात खजुराचे भाव स्थिर

रमजाननिमित्त खरेदीची लगबग; यंदा बाजारात खजुराचे भाव स्थिर

सोलापूर: रमजान महिन्याच्या निमित्त वर्षभर अगदी तुरळक मिळणारे दर्जेदार खजुराचे प्रकार बाजारात आले आहेत.कबकब, सुलतान, नुरी, किमिया, इराणी आदी प्रकारच्या खजुरांची मागणी चांगलीच वाढली आहे. स्नेहींना भेट देण्यासाठी व उपवास सोडण्यासाठी खजुरांची मागणी मोठी असते.

रमजान महिन्याच्या निमित्त बाजारात खजुरांची बाजार अगदी जोरात सुरू आहे. खजुरांची आवक अरब देशांमधून मोठ्या प्रमाणात होते. दुबई हे खजूर बाजाराचे केंद्र आहे. तेथून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होत आहे. या शिवाय इराण, जॉर्डन आदी देशातून खजुरांची आयात होते.आकर्षक पॅकींग, सीडलेस, चवीत मधुरतेमुळे खजुरांची विक्री होते. रमजानमध्ये उपवासामध्ये खजूर अधिक आरोग्यदायी ठरतो. आहारात काही खजूर खाण्याची पद्धत आहे. भरपूर खजुरांचे प्रकार वैविध्यपूर्ण चवीचे असतात त्यामुळे त्याला मागणी देखील अधिक असते.

पोषण मूल्ये असलेल्या खजुरांची मागणी खूप अधिक वाढली आहे. शहरातील विविध भागात खजुरांची स्वतंत्र दुकाने देखील थाटली गेली आहेत. सर्वसाधारण पेंड खजूर वर्षभर बाजारात असते. तीचे भाव सर्वात कमी असतात. पण विदेशातून आलेल्या खजुरांची आवक चांगली आहे. रमजानमुळे बाजारात मागणी देखील भरपूर असते. अगदी रमजान ईदपर्यंत ही मागणी वाढलेली असते. दरात फारसा फरक पडलेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR