35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आज लोकसभा निवडणुकीसाठीचा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. ‘राष्ट्रासोबत राष्ट्रवादी’ असे घोषवाक्य असलेल्या या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना, शेतमालाला भाव, अशा अनेक घोषणांचा वर्षाव करण्यात आला असून, स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.ु

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांच्या उपस्थितीत आज लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात कृषी, वीज, उद्योग अशा विविध क्षेत्रासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अजित पवार म्हणाले की, सर्व समाजाला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा, जातनिहाय जनगणना असे अनेक वैशिष्ट या जाहीरनाम्यात आहेत.’ आम्ही महायुतीत असलो तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. सबका साथ सबका विकास यावर राष्ट्रवादीचा विश्वास आहे असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील घोषणा
* शेतक-यांना किमान आधार मूल्याची जपणूक करणार
* कृषी पिक विम्याची व्याप्ती वाढवणार
* जातीनिहाय जनगणनेसाठी आग्रह धरणार
* वर्षाला मिळणा-या १२ हजार रुपयात वाढ करणार
* यशवंतराव चव्हाणसाहेबांना भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात यावे
* राज्यात देशी आणि परदेशी गुंतवणुकीला चालना, हाताला काम आणि प्रत्येक परिवाराला दाम
* मुद्रा योजनेतून मिळणा-या १० लाखांच्या कर्जात १० लाखांची वाढ करून ते २० लाख करणार
* महाराष्ट्राला कौशल्य विकासाची राजधानी बनवनार
* शहरांमध्ये नोकरी करणा-या महिलांसाठी वर्किंग वुमन होस्टेलची उभारणी
* युवकांना शिक्षणाची समान संधी
* ७० वर्षांवरील नागरिकांना आयुष्यमान भारत योजना
* जातनिहाय जनगणना व्हावी असा आमचा आग्रह राहिल.
* उर्दू माध्यमांच्या शाळांना सेमी इंग्रजी शाळांचा दर्जा
* मराठीला अभिजात भाषेचा दर्जा

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR