38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरशिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात

शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात

देवणी : प्रतिनिधी
येथील प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री ग्रामदैवत महादेव मंदिर यात्रा महोत्सव समितीकडून शिवपार्वती विवाह सोहळा रविवारी (दि.२१) रोजी दुपारी १ वाजता विवाह सोहळा उत्साहात झाला. या यात्रा महोत्सव निमित्त दि.९ एप्रिलपासून दररोज सकाळी महारुद्राभिषेक व रात्री ८ वाजता बैठकीत शिवभजन झाले. यानंतर शुक्रवारी दि.१९ एप्रिल रोजी शिभप ज्योतीताई दापशेडकर यांचे शिवकर्तिन झाले तर शनिवारी दि. २० एप्रिल रोजी डॉ. संजय कळमकर यांचे हसण्याकरिता जीवन अपुला या विषयावर व्याख्यान झाले. या विवाह सोहळ्याकरिता बाहेर गावाहून चिगळीकर, करकेली, सताळा, (तालुका उदगीर जि. लातूर ). व शिरमाळी (ता. भालकी जि. बिदर) व गावातील मानाच्या शेषरावजी मानकरी व दीपक बोंद्रे यांच्या या मानाच्या कवड्या याप्रसंगी उपस्थित होते. या शिव विवाह सोहळ्याकरिता महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना या तिन्ही राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

सोमवारी दि. २२ एप्रिल रोजी दुपारी जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ग्रामदैवत महादेव मंदिर यात्रा महोत्सव समिती व विश्वस्त समिती यांच्याकडून रांगोळी व सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून आलेल्या सदभक्तांना मतदारांची जनजागृती करण्यात आली होती. महादेव मंदिराच्या गाभा-याातील पुष्प अलंकार देवणी येथील कुमारी शिवलीला उमाकांत संते यांनी काढले होती. तर मतदार जनजागृती व शिवपार्वती यांची रांगोळी सौ अश्विनी उंबरे-कोरे यांनी काढली होती. या शिवपार्वती विवाह सोहळ्यास लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे व भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचीही उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR