32.5 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeराष्ट्रीयबंगालमध्ये २६/११ सारख्या हल्ल्याचा प्लॅन

बंगालमध्ये २६/११ सारख्या हल्ल्याचा प्लॅन

कोलकाता : कोलकाला पोलिसांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या घराबाहेरुन रेकी करण्याच्या आरोपाखाली एकाला ताब्यात घेतले आहे. कोलकाता पोलिसांनी सदरील व्यक्तीला मुंबईतल्या माहिम भागातून ताब्यात घेतले आहे. या इसमाचे नाव राजाराम रेगे असल्याचे सांगितले जात आहे. कोलकाता पोलिसांनी सांगितले की, राजारामचे कनेक्शन मुंबई हल्ल्यातील हँडलर डेव्हीड हेडलीसोबत आहे.

एवढंच नाही तर कोलकाता पोलिसांनी दावा केला की, राजाराम हा कोलकातामध्ये मुंबईतल्या २६/११ हल्ल्याप्रमाणे हल्ला करण्याचा कट रचत होता. कोलकाता पोलिसांनी राजारामला अशावेळी अटक केली जेव्हा एक दिवस अगोदरच ममता बॅनर्जी यांनी आपली आणि आपल्या पुतण्याची हत्या होऊ शकते, असे विधान केले होते. कोलकाता पोलिस विभागातील अतिरिक्त पोलिस कमिश्नर मुरलीधर शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, कोलकाता पोलिसांनी टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करण्याच्या प्रकरणात मुंबईतून राजाराम रेगेला ताब्यात घेतले आहे. राजारामने २०११च्या मुंबई हल्ल्याच्या पूर्वीच डेव्हीड हेडलीसोबत संपर्क साधला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR