27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत : छगन भुजबळ

अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत : छगन भुजबळ

रायगड : आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी, राज्यासाठी, जनतेसाठी त्यांच्यासोबत गेलो, स्वार्थासाठी नाही. शेतकऱ्यांचे, शहरातले, गावांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्यासोबत जावच लागणार आहे. महाराष्ट्रातील जनता, पक्षाचे तमाम कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने दाखवून दिले की, भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादीच आहे. अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत गेले आहेत, असा दावा मंत्री छगन भुजबळांनी कर्जतमधील शिबिरात केला आहे.

गावपातळीवर मुळापर्यंत पक्ष रुजला पाहिजे. निवडणुकीतल्या यशामुळे जनताही पाठिशी असल्याचे वक्तव्य छगन भुजबळांनी केले आहे. भुजबळ म्हणाले की, जनतेने या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केले की आमचा निर्णय बरोबर आहे. आमचा पक्ष जुना आहे. १९९९ मधे स्थापन झाला. या पक्षाचा पहिला प्रांताध्यक्ष छगन भुजबळ इथेच आहे. आता सगळेच्या सगळे आमच्यासोबत आले तर आमची काय चूक आहे. तुमचेही हेच चालले होते. त्यातल्या काही गोष्टी प्रफुलभाईंना माहिती आहेत, अजितदादांना माहिती आहे. मला थोड्या माहिती आहे. तळ्यात मळ्यात असे करू नका, काय ते एकदा ठरवा. हे मी म्हणालो होतो, असे भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही पूर्वीपासूनच शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे आहोत. मार्ग बदलला असा आरोप होतो. नितिशकुमार, जयललिता, नवीन पटनायक, महबूबा मुफ्ती हे सगळे भाजपसोबत गेले होते. त्यांची विचारसरणी बदलली का? आम्ही त्यांच्यासोबत गेलो म्हणजे आमची विचारधारा बदलली का? असा सवाल त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR