37.7 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रदेशाला मोदींशिवाय पर्याय नाही

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही

रायगड : तीन राज्यांत भाजपने सत्ता खेचली आहे. तेलंगणा एबीव्हीपीचा कार्यकर्ता काँग्रेसने खेचला अन्यथा तेलंगणाचे चित्रही वेगळे दिसले असते. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झाले, भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा चेहरा नरेंद्र मोदी हेच त्रिवार सत्य आहे, असे देखील अजित पवार या वेळी म्हणाले.

अजित पवार म्हणाले, मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं ठरलं नाही. जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही.

दिशाभूल करण्याचे काम
कर्जतमध्ये दोन दिवसांचे शिबिर घेतले. त्यावर वरिष्ठांनी काही प्रतिक्रिया दिली. मी अनेक वर्षे सत्तेत आहे. मला खोटे बोलता येत नाही. काहीजण दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्ही सर्व जाती-धर्माच्या लोकांना प्रतिनिधी केले आहे. आम्ही काही चांगलं करत आहोत. यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा यांची मदत घेऊन महाराष्ट्राला एक नंबर करण्याचे काम करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.

गावबंदी आंदोलन ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय पुढा-यांना अनेक ठिकाणी गावबंदी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, काहीजण लगेचच आरक्षण द्या अन्यथा मुंबईकडे येऊ म्हणत आहेत. परंतु टिकणारे आरक्षण देण्याचे काम सुरू आहे. काहीजण गावबंदी आंदोलन करत आहेत त्यांना सांगणं आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे करू नये.

अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा
अजित पवारांनी यावेळी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, काहींनी आशीर्वाद द्यायला पाहिजेत परंतु ते थांबायला तयार नाहीत त्यामुळे आम्ही बहुमताने निर्णय घेतला आहे. तीन राज्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात देखील लोकसभा जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार अहोत. ४८ पैकी ४५ जागा आम्ही निवडून आणणार आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR