22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रनव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागांना अलर्ट

नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागांना अलर्ट

ठाणे : देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली.

राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले. राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याचीही ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. देशात आणि राज्यात आढळून आलेल्या जेएन-वन या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटबाबत आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिका-यांची व्हीसीद्वारे विशेष बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली.

आरोग्य यंत्रणा सज्ज
सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे ४५ रुग्ण (मुंबई-२७, पुणे-८, ठाणे-८, कोल्हापूर-१, रायगड-१) आढळून आले आहेत, असे म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR