22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeअंतरराष्ट्रीयअंटार्क्टिकामध्ये एलियन्स!

अंटार्क्टिकामध्ये एलियन्स!

गुगल मॅप्सवर यूएफओ दिसल्याचा दावा

वॉशिंग्टन : पृथ्वीवर परग्रहवासी जीव म्हणजेच एलियन्स दिसल्याचे दावे कित्येक वेळा केले जातात. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील मायामी शहरामध्ये एलियन फिरत असल्याचा दावा केला जात होता. यातच आता अंटार्क्टिकामध्ये एक मोठा यूएफओ दडला असल्याचं म्हटलं जात आहे. गुगल मॅप्सवर ही उडती तबकडी दिसत असल्याचं सांगण्यात येतंय.

या तबकडीचा कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थिंक टँक नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिसणारी रहस्यमय वस्तू म्हणजे ‘यूएफओ’च आहे. २०११ सालापासून ही वस्तू त्याच ठिकाणी असून, त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

तर्क वितर्कांना उधाण
या दाव्यानंतर कित्येक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. ही जर खरी तबकडी असती, तर गुगलने आतापर्यंत त्या गोष्टीला ब्लर केलं असतं असं एका एक्स यूजरने म्हटलं आहे. तर दुस-या एका यूजरने व्हिडिओच्या माध्यमातून ही वस्तू अजूनही तिथेच असल्याचं दाखवून दिलं.

इतक्या वर्षांपासून ही वस्तू तिथेच असल्यामुळे हा बर्फाचा तुकडा तर नक्कीच नाही, यावर नेटिझन्सचे एकमत झाले. मात्र, बर्फ नाही तर ही गोष्ट काय आहे याबाबत अजूनही साशंकता आहे. हा कथित यूएफओ असणारी लोकेशन जिथे आहे, तिथून जवळच काही वर्षांपूर्वी शक्तिशाली मशीन्स पाहिल्याचा दावा अमेरिकेचे माजी नौसेना अधिकारी एरिक हेकर यांनी केला होता. या मशीन्स एलियन्ससोबत संपर्क साधण्यासाठी वापरल्या जात असल्याचे देखील या अधिका-याने म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR