27.6 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeक्रीडाखासदार युसूफ पठाणवर अतिक्रमण केल्याचा आरोप

खासदार युसूफ पठाणवर अतिक्रमण केल्याचा आरोप

वडोदरा : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नवनिर्वाचित खासदार युसूफ पठाण वादात सापडला आहे. गुजरातच्या वडोदरा महानगरपालिकेने युसूफ पठाण यांना जमिनीवरील अतिक्रमणाबाबत नोटीस पाठवली आहे. पठाणने अतिक्रमण केलेली जागा महामंडळाची आहे, असा दावा महानगरपालिकेने केला आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे ६ जून रोजी भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या वडोदरा महापालिकेने ही नोटीस पाठवली होती, मात्र ही बाब आता समोर आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विजय पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वडोदरा महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा शीतल मिस्त्री यांनी गुरुवारी यासंदर्भातील माहिती माध्यमांना दिली. युसूफ पठाणने पश्चिम बंगालच्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR