39.2 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रऋण काढून सण साजरा करण्याची भाजपची प्रवृत्ती

ऋण काढून सण साजरा करण्याची भाजपची प्रवृत्ती

नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत असल्याचे स्पष्ट आहे. समृद्धी महामार्गासाठी ७५ हजार कोटी कर्ज घेतले आहे. देशात आणि राज्याच्या जनतेवर कर्ज वाढवणे, हे विकासाच्या नावावर प्रकल्प लुटण्याचे काम सुरू आहे.

समृद्धी मार्गावर रोज अपघात होत आहेत. कोट्यवधी रुपये त्या लोकांचे रुग्णालयात खर्च होत आहेत. रस्ते मारण्यासाठी नाही, तर सुविधांसाठी असतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
भाजपा जातीय आधारावर सार्वजनिक पुजारी नेमण्याचे धोरण बदलणार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत राजकीय समझोता करायला तयार आहोत, असे जाहीर करत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नवी गुगली टाकली. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावर देखील पत्रकारांनी नाना पटोले यांना प्रश्न विचारला. यावर प्रकाश आंबेडकरांवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात १५ जागांवर अजूनही तिढा आहे. तो सुटलेला नाही. आघाडी होणार की नाही याविषयी शंका आहे. जागेचे हे भिजत घोंगडे मिटल्याशिवाय वंचितला किती जागा मिळणार हे सांगता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडी जागा सोडो अथवा न सोडो ४८ जागा लढविण्यासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत. २७ जागांची पूर्ण तयारी झाली आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीला मी उद्या जाणार आहे. त्यांचा निर्णय झाल्यावर आम्ही आमचा निर्णय घोषित करू, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR