साना : जगात सध्या रशिया-युक्रेनमध्ये आणि इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. आता तिस-या युद्धाला तोंड फुटले आहे. अमेरिकेने लाल सागरात दादागिरी करणा-या हुती बंडखोरांना चांगलाच धडा शिकवला. महत्त्वाच म्हणजे अमेरिकेने ब्रिटनच्या साथीने मिळून ही कारवाई केली.
लाल सागरात दहशत निर्माण करणा-या हुती बंडखोरांच्या ठिकाणांवर अमेरिका-ब्रिटनने मिळून हवाई हल्ले केले. लाल सागरात हुती बंडखोर अमेरिका-ब्रिटनच्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करत होते.
अमेरिकेच्या या हल्ल्यात येमेनचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या या संयुक्त कारवाईनंतर हुती बंडखोर सुद्धा मोठा हल्ला करु शकतात. हुती बंडखोर ही इराणने पोसलेली संघटना आहे. इस्रायल-हमास युद्धात हुती बंडखोर हमासच्या बाजूने आहेत.
लाल सागरात हुती बंडखोरांनी आतापर्यंत २७ हल्ले केले आहेत. यात ५० पेक्षा जास्त देशांना त्रास झाला. लाल सागरात होणा-या या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी २००० पेक्षा अधिक जहाजांना हजारो मैल लांबून प्रवास करावा लागत आहे.