36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजनअनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये बॉलिवूडचा तडका

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये बॉलिवूडचा तडका

शाहरूख-सलमान आणि आमिरने एकत्र डान्स करून पाहुण्यांचे केले मनोरंजन

मुंबई : प्रसिध्द उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघे १२ जुलै २०२४ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. यापूर्वी अंबानी परिवाराने गुजरातमधील जामनगरमध्ये १ ते ३ मार्च दरम्यान प्री-वेडिंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा पहिला दिवस जगप्रसिध्द पॉप गायिका रिहानाने गाजवल्यानंतर या कार्यक्रमाचा दुसरा दिवस बॉलिवूडच्या तारकांनी गाजवला. दुस-या दिवशी आतापर्यंत बॉलिवूडच्या निर्मात्यांना जे जमलं नाही ते अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगने करून दाखवले. प्री-वेडिंगच्या दुस-या दिवशी बॉलिवूडचे तिन्ही खान आमिर खान, शाहरूख खान आणि सलमान खान एकत्र डान्स करताना दिसले.

प्री-वेडिंगच्या दुस-या दिवशी शनिवारी रात्री एका संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.जिथे बॉलिवूड कलाकारांनी जोरदार डान्स केला. तर कित्येक वर्षांनी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणा-या शाहरूख, सलमान आणि आमिर खान या अभिनेत्यांनी एकाच मंचावर एकत्र डान्स करून उपस्थित पाहुणे मंडळीचे मनोरंजन केले. या तिघांच्या डान्सचे व्हीडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. यामुळे या तिन्ही अभिनेत्यांचे चाहते चांगलेच सुखावले असून, त्यांच्या व्हीडीओवर भन्नाट कमेंट्स करत आहेत. या व्हीडीओमध्ये तिघेही एकमेकांच्या चित्रपटातील गाण्यासह नाटू-नाटू गाण्यावरही थिरकताना दिसले.

गेल्या दोन दिवसांपासून अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगचे सेलिब्रेशन सुरू आहे. या सेलिब्रेशनमध्ये मनोरंजन जगतापासून ते क्रिकेटर्स, उद्योगपती आणि जगभरातील सेलिब्रिटी पाहुणे म्हणून उपस्थित झाले आहेत. तर बॉलिवूडच्या तीन खान व्यतिरिक्त, जान्हवी कपूर, सोनम कपूर, रितेश आणि जेनेलिया देशमुख, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, सुहाना खान, नव्या नवेली नंदा, सारा तेंडुलकर, करीना कपूर-खान, अभिषेक बच्चन, रणवीर सिंह यांच्यासह अनेक तारे-तारका कार्यक्रमात दिसल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR