39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडनांदेडच्या तरुणांच्या कारला अपघात, चौघांचा मृत्यू

नांदेडच्या तरुणांच्या कारला अपघात, चौघांचा मृत्यू

चाकूर : लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रा पाटी दरम्यान उसाच्या ट्रॅक्टरला भरधाव वेगातील कारने पाठीमागून धडक दिल्यामुळे तुळजापुरला दर्शनासाठी निघालेल्या नांदेड येथील चौघांचा मृत्यू झाला आहे.

अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.३) पहाटे साडेतीन वाजता घडली आहे. नांदेड येथील पाच तरूण एम. एच. २६ बी. सी. ८२८६ क्रमांकाच्या कारमधून लातूरमार्गे तुळजापूरकडे निघाले होते. लातूर- नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रा पाटीच्या दरम्यान शेतक-यांचा ऊस लातूरच्या कारखान्याकडे घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून कारने जोराची धडक दिली.

कारच्या धडकेनंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी इतर तिघांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंकाढाई (रा. किल्लारोड नांदेड) मोनु बालाजी कोतवाल, नरमण राजाराम कात्रे, कृष्णा यादव (रा. नांदेड) यांचा अपघातात मृत्यू झाला असून शुभम किशोर लंकाढाई हे गंभीर जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR