36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजनकतरिनाने केले सासू-सास-याचे कैतुक

कतरिनाने केले सासू-सास-याचे कैतुक

मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी कतरिना कैफ एक प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच एक परफेक्ट पत्नी आणि सून देखील आहे. कतरिनाने २०२१ मध्ये अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली. कतरिना तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडिया हँडलवर अ‍ॅक्टिव्ह असून, अनेकदा विकी आणि स्वत:चे फोटो शेअर करत असते. नुकतेच, कतरिनाने एका मुलाखतीदरम्यान तिच्या सासू-सास-यांचे खूप कौतुक केले.

कतरिना कैफचे सासरे शाम आणि सासू वीणा कौशल यांच्यासोबत खूप प्रेमळ नाते आहे. त्यांच्याबद्दल बोलताना कतरिनाने म्हटले की, विक्कीच्या आई-वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार देऊन संगोपन केले आहे. विकी आणि सनी दोघेही ज्येष्ठांचा आणि कुटुंबातल्या लोकांचा आदर करतात. त्यांना नाते कसे जपायचे हे माहीत आहे, असे कॅटने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR