24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीपशुसंवर्धन विभाग वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभाग वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

परभणी : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतक-यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत आर्थिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी १२ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन आ. डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे.

विविध योजना उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक शेतक-यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत २०१९-२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून लाभार्थी निवड करण्यात येते. अर्जदारास दरवर्षी नव्याने अर्ज करावा लागू नये यासाठी पाच वर्षांपर्यंत प्रतीक्षा यादी लागू केली आहे. त्यामुळे अर्जदारांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादी क्रमांकानुसार लाभ मिळवण्याबाबतचा अंदाज येत आहे.

राज्य व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दुधाळ गाई, म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १००० मासल कुकुट पक्षांच्या संगोपनासाठी, निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुकुट पिलांचे वाटप करणेसाठी निवड प्रक्रिया यंदा राबवली जाणार आहे. तसेच पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी अर्ज करण्याची निवड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या वतीने संबंधित लाभार्थ्याला दुधाळ जनावरांसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी जिल्ह्यातील पशुपालकांनी अर्ज करावयाचा आहे. अर्जदाराला पशुसंवर्धन विस्तार अधिका-यांच्या उपस्थितीत जिल्हा किंवा राज्याबाहेर पशु बाजारातून जनावरांची खरेदी करून दिली जाते. पशुसंवर्धन विकासाला प्रवाहात आणण्यासाठी विभागामार्फत ७५ टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये १० शेळ्या मेंढ्या, गाय गटामध्ये दोन गाई वितरीत करण्यात येतात. यासाठी १२ डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन परभणीचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR