35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeपरभणीनुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी

पूर्णा : तालुक्यातील कात्नेश्वर येथे दि.२७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री वादळी वा-यासह अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी दि.२८ नोव्हेंबर रोजी कात्नेश्वर येथील शेतक-यांनी तहसीलदार माधवराव बोथीकर यांना निवेदन दिले आहे.

तालुक्यातील कात्नेश्वर येथे वादळी वा-यासह जोरदार पावसाने शेतात उभे असलेल्या केळी, हरभरा, कापूस, तूर, हळद, ज्वारी पपई, गहू आदी पिके पूर्णत: उध्वस्त झाली आहेत. कात्नेश्वर मंडळात ७६ किमी पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकस झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. यावेळी शेतकरी प्रमोद चापके, मेघशाम चापके, उद्धव चापके, भगवान चापके, महेश वैद्य, माणिक चापके, दत्ता चापके, शिवाजी चापके, शंकर पाटील पालकर, शरद चापके, रामप्रसाद चापके, ओंकार चापके, शेषराव चापके, दीपक चापके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR