मुंबई : अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटाने सहाव्या दिवशी देखील काही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.
‘अॅनिमल’ या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी ३०.०० कोटी रुपये कमवले आहेत. आता या चित्रपटाने भारतात ३०० कोटींचा टप्पा ओलांडला असून सहा दिवसांत या चित्रपटाने ३१२.९६ कोटींची कमाई केलेली आहे.
रणबीरच्या ‘ऍनिमल’ या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी ३० कोटींचे कलेक्शन करून शाहरूख खानच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ तसेच ‘बाहुबली २’ चे रेकॉर्ड मोडले आहे. अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी २६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. शाहरूखच्या ‘पठाण’ या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी २५.५ कोटी कमाई केली होती. तर ‘जवान’ चित्रपटाने सहाव्या दिवशी २४ कोटींची कमाई केली होती.