39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानच्या सुफी मलिकला अंजलीचा ‘तलाक’

पाकिस्तानच्या सुफी मलिकला अंजलीचा ‘तलाक’

इस्लामाबाद : पाकिस्तानची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूफी मलिक आणि भारतीय अंजली चक्र यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षांपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने हे लेस्बियन जोडपे चांगलेच चर्चेत आले होते.

आता अंजलीने सुफीवर बेईमानी केल्याचा आरोप करत ब्रेकअप घेतल्याचे सोशल मिडीयावर सांगितले आहे. तर सूफीने आपली चूक आधीच मान्य केली होती. हे लेस्बियन कपल तेव्हाच चर्चेत आले जेव्हा दोघींनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. आता अंजलीने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून सुफीवर बेईमानीचा आरोप केला आहे.

हे लेस्बियन कपल २०१९ मध्ये चांगलेच चर्चेत आले होते, जेव्हा दोघींनी त्यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर शेअर केला होता. अंजलीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहले की, हा मोठा धक्का असू शकतो पण सत्य हे आहे की आता आम्ही वेगळे झालो आहे. सुफीच्या बेईमानीमुळे मी माझे लग्न आणि नातेसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पण सुफीबद्दल कोणीही वाईट बोलू नये.

काही आठवड्यांपूर्वी सुफीने इंस्टाग्रामवर आपण चूक केल्याची कबुलीही दिली होती. लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी तिने आपल्या पार्टनरची फसवणूक केली आणि ही तिची चूक असल्याचे सूफीने म्हटले होते. सुफी म्हणाली होती, मी ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करते त्याला मी दुखावते. जिची मला सर्वात जास्त काळजी आहे तिने माझा विश्वासघात केला आहे. हे जोडपे पाच वर्षे एकत्र होते. दोघींनी लग्नही केले होते.

अंजली न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वेडिंग प्लानिंगचे काम करते. सुफी लाइफस्टाइल आणि ट्रॅव्हल कंटेट क्रिएटर आहे. अंजलीने असेही म्हटले आहे की, तिने तिची ऑनलाइन लग्नाची रजिस्ट्री देखील रद्द केली आहे. या दोघांचे एक यूट्यूब चॅनल आहे ज्याचे एक लाखाहून अधिक सब्सक्राइबर आहेत. त्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्या कायमच आपल्या पोस्टमुळे चर्चेत असत. त्या दोघी आपले फोटो सोशल मिडीयावर कायमच शेअर करत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR