34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीयरुग्णालये, मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे द्या : केजरीवाल

रुग्णालये, मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे द्या : केजरीवाल

नवी दिल्ली : अबकारी कर गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर ईडीच्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवारी) कोठडीतून दुसरा आदेश जारी केला.

आज (मंगळवारी) त्यांनी दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांना रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे मिळत राहतील आणि त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरळीतपणे केल्या जातील याची खात्री करण्यास सांगितले. स्वत: सौरभ भारद्वाज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या कोठडीत असतानाही सामान्यांच्या अडचणी वाढू नयेत, असे वाटत आहे.

दरम्यान, अटकेत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जारी केलेल्या सरकारी आदेशाची ईडीने दखल घेतली आहे. ईडीच्या अधिका-यांनी सांगितले की, कोठडीत असताना मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना जारी करणे हे पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाच्या कक्षेत येते का याचा तपास केंद्रीय एजन्सी करत आहे.

अरविंद केजरीवाल कोठडीत असताना महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करू शकतात का? ते तुरुंगात असल्याने त्यांना जेल मॅन्युअल पाळावे लागतील. तुरुंगात त्यांना पेन किंवा कागद देता येणार नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार, ते दररोज संध्याकाळी ६ ते ७ दरम्यान अर्धा तास पत्नी आणि स्वीय सहाय्यकाला भेटू शकतात, तर अर्धा तास त्याच्या वकिलांना भेटू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR