26.4 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeराष्ट्रीयसरकारविरोधात अण्णामलाईंचा आत्मक्लेश

सरकारविरोधात अण्णामलाईंचा आत्मक्लेश

स्वत:ला दिले चाबकाचे फटके मारले

कोईम्­बतूर : तामिळनाडूतील वाईटाचा नायनाट होण्यासाठी मी दि. २७ डिसेंबर रोजी स्­वत:ला सहा वेळा फटके मारणार असल्याचे शुक्रवारी भाजप नेते अण्णामलाई यांनी म्हटले होते. त्यानुसार त्यांनी कोईम्­बतूर येथील त्यांच्या निवासस्­थानाबाहेर आज स्वत:ला चाबकाने फटके मारल्याचा व्हीडीओने शेअर केला आहे.

तामिळनाडू भाजप अध्यक्ष अण्णामलाई यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी सत्ताधारी द्रमुक सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले होते की तामिळनाडूमध्ये जोपर्यंत द्रमुकचा पाडाव होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही. स्­वत:ला सहा वेळा फटके मारणार तसेच राज्यातील भगवान मुरुगन यांच्या सर्व सहा पवित्र निवासस्थानी ४८ दिवस उपवास करणार अशी घोषणा त्य्ािांनी केली होती. अण्­णा विद्यापीठातील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्­ह्यासंदर्भातील कागदपत्रे उघड केल्­याने त्­यांनी राज्य पोलिसांवरही सडकून टीका केली. पोलिसांनी या प्रकरणाने १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची ओळख उघड केली. या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी द्रमुक नेत्­यांशी संबंध असल्­याने पोलिसांनी त्­याचा गुन्­ह्यातून उल्­लेख वगळला आहे, असा आरोपही त्­यांनी केला.

तामिळनाडूमधून द्रमुकला सत्तेतून बेदखल करत नाही तोपर्यंत मी अनावणी फिरणार आहे. मी राज्­यातील जनतेला आवाहन करतो की त्­यांनी सरकारचा कारभार पहावा. मी निवडणूक जिंकण्­यासाठी पैसे वाटणार नाही. आम्­ही पैसे न वाटत निवडणूक लढवणार आहोत, असेही त्­यांनी यावेळी सांगितले.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली
कोइम्बतूर येथे त्यांच्या गावी माध्यमांशी संवाद साधताना के. अण्णामलाईं यांनी द्रमुक सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी द्रमुक सरकारवर आरोप करताना संतप्त झालेल्या अण्णामलाईं यांनी आपले बूट काढले आणि जोपर्यंत राज्यातील द्रमुक सरकार उलथून टाकले जात नाही तोपर्यंत आपण अनवाणी फिरणार असल्याचा उल्लेखदेखील त्यांनी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR