22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयमहानगरातील मतदारांमध्ये उदासिनता

महानगरातील मतदारांमध्ये उदासिनता

नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणूक. यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी निवडणूक आयोग सतत प्रयत्नशील असतो. मात्र, काही मतदारसंघांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी असते. त्यात सुशिक्षित आणि प्रगत म्हणवणा-या महानगरांमध्ये तर मतदार फार उदासिन असल्याचे आकडेवारी सांगते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाचे सरासरी मतदान ६७.४ टक्के होते. त्यापेक्षा कमी मतदान झालेल्या २६६ मतदारसंघांची यावेळी निवडणूक आयोगाने ओळख पटविली असून त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

– २९.७ कोटी मतदारांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले नाही.
– ११ मोठ्या राज्यांमध्ये मतदानाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी.
– २९ मतदारसंघ महानगरांमधील आहेत, जिथे ५८ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.
– ११ मतदारसंघ हे महत्त्वाच्या शहरांमधील आहेत.
– ८ मतदारसंघ महाराष्ट्रातील असून ते सर्व मोठ्या शहरांमधील आहेत.
– १४ महानगरातील मतदारसंघांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले.
– ५० सर्वात कमी मतदान झालेल्या मतदारसंघातील
– १७ जागा या महानगर किंवा मोठ्या शहरांतील आहेत.
– ७० टक्के मतदारसंघ हे युपी, महाराष्ट्र आणि बिहारमधील आहेत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR