रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त

छत्रपती संभाजीनगर : लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शहरात प्रचारासाठी आले होते. यावेळी घेतलेल्या सभेत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना लातूरच्या राजकारणाचा उल्लेख केला. भाषणाच्या ओघात त्यांनी, लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसतोय, तो पाहता विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात शंका नाही, असे विधान केले. या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले असून, विशेषत: काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असताना रविन्द्र चव्हाण यांनी प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसताच दिलगिरी व्यक्त केली.

रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. लातूरमध्ये विलासराव देशमुख हे केवळ राजकीय नेते नव्हे, तर जनतेच्या मनात खोलवर रुजलेले नेतृत्व मानले जाते. त्यांच्या कार्यकाळात लातूर आणि परिसराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण आजही नागरिक कृतज्ञतेने काढतात. त्यामुळे आठवणी पुसल्या जातील, या विधानाला अनेकांनी लातूरच्या अस्मितेला आव्हान देणारे म्हटले आहे.

एकूणच, रवींद्र चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे लातूरच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. रितेश देशमुख यांची भावनिक पण ठाम प्रतिक्रिया, तसेच काँग्रेस नेत्यांचा आक्रमक पवित्रा पाहता, येत्या काळात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे. विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्याचा दावा करणा-यांना लातूरकर आणि महाराष्ट्रातील जनतेकडून कसा प्रत्युत्तर दिले जाईल, याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता होती. त्यामुळे अखेर रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. विलासराव देशमुख यांच्या नावाने काँग्रेस मते मागत आहेत. त्यामुळे मी तसे वक्तव्य केले होते. मात्र, त्यांच्या मुलांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

विलासराव देशमुख साहेब लातूरची नव्हे तर महाराष्ट्राची शान : सुरज चव्हाण
मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलो तरी एक लातूरकर म्हणून एवढंच सांगतो विलासराव देशमुख साहेब लातूरची नव्हे तर महाराष्ट्राची शान होते. भाड्याची गर्दी विलासराव देशमुख साहेबांचे नाव कधीही पुसू शकणार नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news