38.3 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeपरभणी८ गावांसाठी पालक अधिका-यांची नेमणूक

८ गावांसाठी पालक अधिका-यांची नेमणूक

पालम : जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. त्याअनुंषगाने पालम तालुक्याातील एकुण ८ गावांचा समावेश असून प्रत्येक गावांना तालुकास्तरीय एक पालक अधिका-यांची नेमणुक करण्यात आलेली आहे.

यात पालक अधिकारी शेखराजूर-तहससिलदार कैलासचंद्र वाघमारे, लाडंकवाडी-गट विकास अधिेकारी उदयसिंग शिसोदे, खडी-तालुका कृषि अधिकारी आबासाहेब देशमुख, धनेवाडी- मुख्याधिकारी नगर पंचायत आशितोष चिंचालकर, खोरस-नायब तहसिलदार महसूल राजेश्वर पवळे, पेठशिवणी नायब तहसिलदार महसूल भागवत तेलभरे, बनवस-नायब तहसिलदार विनोद पवार व पेठपिंपळगाव-गट शिक्षण अधिकारी शिवाजी गायकवाड यांची नेमणुक करण्याहत आली आहे.

सर्व पालक अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी, ग्रामस्तरीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडीताई, आशा वर्कर, मुख्याध्यापक, पोलिस पाटील, रास्त भाव दुकानदार यांची आढावा बैठक तहसिल कार्यालय पालम येथे आयोजीत करण्याात आली. सर्व प्रथम प्रत्येक गावांची योजनानिहाय माहीती तयार करून पालकमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार गावात जाऊन गावक-यांसोबत चर्चासत्र आयोजीत करावे. यावेळी तहसिलदार वाघमारे व उपस्थितांनी माहीती दिली. टास्क फोर्सद्वारे प्रभावीपणे योजनेची अंमलबजावणी करण्याचे यावेळी सुचित करण्यात आले. यावेळी सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR