22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजन‘सिंघम’मध्ये अर्जुन खलनायकाच्या भूमिकेत

‘सिंघम’मध्ये अर्जुन खलनायकाच्या भूमिकेत

मुंबई : ‘सिंघम’ चित्रपटाचे पहिले दोन भाग यशस्वी झाल्यानंतर आता त्याचा तिसरा भाग लवकरच येणार आहे. रोहित शेट्टीचा आगामी ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. रिलीजसाठी भरपूर अवकाश असूनही या सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
गेल्या महिन्यात रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’मधील अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक शेअर केला होता.

पोस्टरमधील त्याचा लूक थरारक असा होता. हातात रक्ताने माखलेली तलवार, चेह-यावर रक्त आणि अभिनेत्याचे उत्कट हास्य पाहून चाहते थक्क झाले होते. आता नव्या सिनेमातील अर्जुन कपूरच्या पात्रावरून पडदा हटवला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, अर्जुन कपूर रोहित शेट्टीच्या अ‍ॅक्शन थ्रिलर ‘सिंघम अगेन’मध्ये डेंजर लंकाची भूमिका साकारणार आहे. अभिनेता जॅकी श्रॉफसोबत तो एक भयानक खलनायक असेल. ते दोघे मिळून सिंघमचा पराभव करतील.

अर्जुन कपूरच्या पात्राला डेंजर लंका असे नाव देण्यामागे एक मोठी कथा असल्याचे म्हटले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना कळेलच. अर्जुन कपूरचा हा अवतार पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले असून त्याचे कौतुक करत आहेत. हा २०२४ चा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल अशी अंदाजबांधणी काहींना आतापासूनच सुरू केली आहे.

चित्रपटातील सर्व कलाकारांची पात्रे आणि फर्स्ट लूकचे पोस्टर्स एकापाठोपाठ एक रिलीज होत आहेत. ‘सिंघम अगेन’मधील अजय देवगण, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि करीना कपूरनंतर आता सिनेमाचा खरा खलनायक अर्जुन कपूरच्या पात्राचे नाव उघड करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR