34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रविद्यापीठांना वंचितांपर्यंत पोचावे लागेल : राज्यपाल रमेश बैस

विद्यापीठांना वंचितांपर्यंत पोचावे लागेल : राज्यपाल रमेश बैस

पुणे : प्रतिनिधी
भारत प्राचीन काळापासून कायमच शिक्षणाचे माहेरघर राहिलेला आहे. भारतातील तक्षशिला व नालंदा विद्यापीठे ही पूर्वी जागतिक शिक्षणाची केंद्रस्थाने होती. परंतू आताय आपल्या देशातील हुशार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. मात्र आता आपण त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देवून देशातच थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत..खासगी तसेच सरकारी विद्यापीठांनी या शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला हवे, असे मत महाराष्ट्राचे राज्यापाल रमेश बैस यांनी मांडले.

ते एज्युकेशन प्रमोशन सोसायटी फॉर इंडियाच्या (ईपीएसआय) तर्फे आयोजित ‘इंडिया@२०४७’: विकसित भारतासाठी उच्च शिक्षणाची भूमिका, या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. याप्रसंगी, ईपीएसआयचे अध्यक्ष तथा रामाय्या विद्यापीठ बंगळूरूचे कुलपती डॉ.एम.आर.जयराम, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थापक कुलपती डॉ.जी.विश्वनाथन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा

कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, बिर्ला इन्स्टीट्यूट ऑफ आर्ट अँड कॉमर्सचे डॉ.एच. चतुर्वेदी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन उपाध्यक्ष डॉ.अभय जेरे, मानव रचना शिक्षण संस्थेचे डॉ.प्रशांत भल्ला आदी या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.मंगेश कराड यांनी तर आभार डॉ.प्रशांत भल्ला यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR