जिंतूर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सद्गुरु प. पु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत सर्व रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून डॉ. दिलीपकुमार पाटील, डॉ. शुभांगी गौरकर, जिंतूर केंद्रामार्फत आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ वैद्य शिवप्रसाद सानप, प्रसिद्धी प्रमुख सचिन रायपत्रिवार, महेश देशमुख, केंद्र प्रातिनिधी विश्वनाथ वाघ उपस्थित होते. हे शिबिर सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ५ वाजेपर्यंत सुरू होते. या शिबीरात नाड़ी परीक्षेद्वारे डॉ. दिलीप कुमार पाटील व डॉ. शुभांगी गौरकर व वैद्य शिवप्रसाद सानप यांनी रुग्णांची नाडी तपासणी करून औषधोपचार केले.
या शिबिरात सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार, आम्लपित्ताचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधींचे जास्त रुग्ण आढळून आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नियमित कार्यरत सेवेकरी लखुजी जाधव, उद्धव देशमुख, वसंतराव देशमुख, रोहन सांगळे, माधव देशमुख, रामा दुधारे, केंद्र प्रतिनीधी विश्वनाथ वाघ व सर्व सेवेकरी यांनी अथक परिश्रम घेतले.