25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeराष्ट्रीयप्रज्ज्वल रेवण्णाविरोधात अटक वॉरंट

प्रज्ज्वल रेवण्णाविरोधात अटक वॉरंट

बंगळुरु : महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्याचे हजारो व्हीडीओ तयार करणारा कर्नाटकातील जेडीएसचा खासदार प्रज्ज्वल रेवन्ना याच्याविरोधातील फास आता आणखी आवळला आहे. कारण त्याच्या विरोधातील कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. पण सध्या रेवण्णा हा भारतातून फरार झाला आहे.

एसआयटीच्या मागणीनुसार कर्नाटकातील कोर्टाने हसनमधील जेडीएस खासदाराविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. नोटीस बजावूनही प्रज्ज्वल रेवण्णा एसआयटीसमोर हजर झाला नसल्याने त्याच्याविरोधात आता कोर्टानं अटक वॉरंट काढले आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याच्या कथित व्हीडीओ प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रेवण्णा हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जेडीएसचा उमेदवारही आहे.

दरम्यान, कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने त्याच्याशी संबंधित कथित स्लीझ व्हीडीओंचा तपास करणारी टीम आत्मसमर्पण करण्यासाठी बंगळुरूला परत येण्याची वाट पाहत आहेत. ३३ वर्षीय रेवण्णाने २७ एप्रिल रोजी डिप्लोमॅटिक पासपोर्ट वापरून देश सोडला आहे, सध्या तो जर्मनीत असल्याचा संशय आहे. कर्नाटक सरकारने त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR