पुणे : पुण्यातून जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडितांकडून तब्बल ३५ लाख रुपये देखील उकळले आहेत. ते पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाचा मृत्यू होईल असेही धमकावण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५० लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या मुलाचा आणि पतीचा मृत्यू होईल. तुमच्या घराचा नायनाट होईल, असे बोलून आरोपीने धमकावले होते. त्यानंतर पीडित महिलेने चंदन नगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली होती.
अघोरी पूजा करत ३५ लाख रुपयांची भोंदू बाबा कडून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चंदन नगर पोलीस स्टेशन मध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात वारंवार असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलाला मानसिक आजारातून बरे करण्यासाठी जादूटोणा करण्यात आला आहे. घरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि मुलाची मानसिक आजारातून मुक्तता करण्यासाठी आरोपींनी पीडितांचा विश्वास संपादन करून अघोरी विद्या केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.