कोल्हापूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यानंतर काही नाराजांनी कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयावर दगडफेक केली. अज्ञाताकडून मध्यरात्रीच्या सुमारास हे कृत्य करण्यात आले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा मोठा परिणाम राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिसून आला.
काँग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज गटाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस कार्यालयाच्या परिसरात अनेक ठिकाणी काळ्या अक्षरात कार्यकर्त्यांनी चव्हाण पॅटर्न लिहिले आहे. त्यांनी त्यांची नाराजी जाहीर केली आहे.