16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयनिवडणुकांचे निकाल एकतर्फी लागल्याने सर्वांनाच शंका : मायावती

निवडणुकांचे निकाल एकतर्फी लागल्याने सर्वांनाच शंका : मायावती

गांभीर्याने विचार करण्याची आणि त्यावर तोडगा काढण्याची गरज

लखनौ : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या असून राज्यांचे निकालही जाहीर झाले आहेत. तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले आहे. अशा स्थितीत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपच्या या विजयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, हा विचित्र निकाल गिळंकृत करणे फार कठीण आहे. निवडणुकांचे निकाल एका पक्षाच्या बाजूने एकतर्फी लागल्याने सर्वांनाच शंका, आश्चर्य आणि चिंता वाटणे स्वाभाविक आहे, असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळातील वातावरणाचा विचार करता असा विचित्र निकाल लोकांना पचनी पडणे फार कठीण आहे. संपूर्ण निवडणुकीदरम्यान वातावरण पूर्णपणे वेगळे आणि लढतीसारखे रंजक होते, पण निवडणुकीचा निकाल त्याहून पूर्णपणे वेगळा आणि पूर्णपणे एकतर्फी असणे ही एक गूढ बाब आहे. ज्यावर गांभीर्याने विचार करण्याची आणि त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

मायावती म्हणाल्या की, बसपच्या सर्व लोकांनी तन, मन, धन आणि ताकदीने ही निवडणूक लढवली, त्यामुळे वातावरणात नवसंजीवनी आली. परंतु अशा विचित्र निकालांनी निराश न होता त्यांनी बाबा साहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी बसपा कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहनही केले आहे. १० डिसेंबरला लखनऊमध्ये होणाऱ्या बसपाच्या बैठकीचीही माहिती त्यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR