नवी दिल्ली : दहशतवादी संघटना काश्मीर फाइटचे एक पत्र पुढे आल्याने खळबळ माजली आहे. ज्याप्रकारे हमासने काही दिवसांपूर्वी इस्त्रायलवर हल्ला केला तसाच हल्ला आम्ही करू. पर्यटक, परप्रांतीय लोक आणि सुरक्षा दलांना निशाणा बनवू. त्याचसोबत पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना टार्गेट करू असा इशारा काश्मीर फाईटने दिला आहे.
काश्मीर फाईटने त्यांच्या दहशतवादी सदस्यांना म्हटले आहे की, हायप्रोफाईल व्यक्तींना निशाणा बनवा. गाझा इथे होणारा नरसंहार हा त्या सर्व लोकांचे डोळे उघडणारा असावा जे संयुक्त राष्ट्र अथवा अन्य मानवाधिकारी संघटनांकडून अपेक्षा ठेवतायेत.जर हे गाझातील नरसंहारासाठी तयार असतील तर भविष्याबाबतही त्यांनी विचार करावा. आता वेळ आलीय आयआयओजेकेच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी त्यांची रणनीती बदलायली हवी आणि भारतीय प्रशासन आणि त्यांच्या हायप्रोफाईल लोकांना टार्गेट करायला हवे त्यांनी पत्रात सांगितले. तसेच या भयंकर स्थितीत या दहशतवाद्यांनी बाहेर यायला हवे आणि त्याच ठिकाणांवर हल्ला करावा जिथे सर्वाधिक नुकसान होईल. टार्गेटवर लक्ष ठेवा आणि समुहांना अलर्ट करा असे पत्रात म्हटले आहे.
धमकीच्या या पत्रात काय आहे?
– हायप्रोफाईल व्यक्ती, ज्यांचा प्रभाव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जम्मू काश्मीरमध्ये आहे त्यांना टार्गेट करा.
– भारत सरकारच्या रणनीती ठरविणा-या संस्थांना लक्ष्य करा.
– काहीतरी मोठा विचार करा, आपले लक्ष्य हे पंतप्रधान, गृहमंत्र्यांवर ठेवावे.
– सुरक्षा दलांच्या कार्यालयांना तणावाखाली ठेवा, अशा पर्यटकांना टार्गेट करा. ज्यांच्या माध्यमातून जम्मू काश्मीरात सर्वसामान्य परिस्थिती असल्याचे दाखवून देतायेत.
– परप्रांतीय लोकांची ओळख पटवा आणि त्या लोकांवर हल्ला करा. ज्याठिकाणी सर्वात जास्त त्रास होईल तिथे रस्त्यावर रक्त सांडा.
– कुठल्याही गोष्टीत स्पष्टता आणा. जे केले ते का केले हे सांगा. प्रत्येक हल्ल्यावेळी ते स्पष्ट करा.