24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रबुलडाण्यात पोलिस अधीक्षकांवर हल्ला

बुलडाण्यात पोलिस अधीक्षकांवर हल्ला

दोन पोलिस अधिका-यांसह एक कर्मचारी जखमी

बुलडाणा : प्रतिनिधी
बुलढाणा शहराच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात नुकतेच एका पोलिसावर कोयत्याने हल्ला केल्याचे प्रकरण ताजे असताना बुलडाणा शहरात देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

अवैध शस्त्रविक्रेत्याकडे छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन पोलिस अधिका-यांसह एक कर्मचारी जखमी झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. यात पोलिसांनी प्रतिकारासाठी गोळीबार देखील केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नव नियुक्त पोलिस अधीक्षकांवर पहिल्याच दिवशी हा हल्ला करण्यात आल्याने गुन्हेगारांना कायद्यासह पोलिसांचीही भीती उरलेली नाही का? असा सवाल या निमित्पाने उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरालगत असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरात अवैध शास्त्रांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्री म्हाडा कॉलनी परिसरातील मनोजसिंग टाक याच्या घराजवळ गेले, दरम्यान लपून बसलेल्या आरोपी मनोजसिंग टाक याने पोलिस पथकावर तलवारीने हल्ला केला. यात एक सहाययक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक आणि एक कर्मचारी असे तिघे गंभीर जखमी झाले. त्यावेळी सोबत असलेल्या एका पोलिस कर्मचा-याने बचावासाठी आपल्या एसएलआर रायफलीतून तीन राऊंड आरोपीच्या दिशेने फायर केले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन आरोपी मनोजसिंग टाक फरार झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR