23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रबनावट तिकिटांच्या माध्यमातून विमानतळात घुसण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

बनावट तिकिटांच्या माध्यमातून विमानतळात घुसण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

पुणे : प्रतिनिधी
पुण्यात कधी काय घडेल हे सांगता येणार नाही. मागील काही दिवसांपासून विविध घटनांमुळे पुणे शहर चर्चेत आले असतानाच आता पुण्यात विमानाची बनावट तिकिटे तयार केली जात असल्याची खळबळजनक माहिती मिळत आहे.

या बनावट तिकिटांच्या माध्यमातून विमानतळावर घुसून बनावट तिकिट दाखवून विमानात चढणा-या दोघांना विमानतळ सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले आहे.

सलीम गोलेखन आणि नसरुद्दीन खान अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. काल पुण्याच्या लोहगाव एअरपोर्टवरून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बनावट तिकिटाच्या आधारे पुणे ते लखनौ इंडिगो कंपनीच्या विमानात या दोन्ही संशयितांनी घुसून विमान प्रवास करण्याचा प्रयत्न केला असता एअरपोर्ट पोलिसांनी त्यांना अटक केली असून,पुढील तपास करण्यात येत आहे. पुण्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR