22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडछगन भुजबळांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

छगन भुजबळांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी

नांदेड – राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आणि ओबीसी नेतेमंडळीत शाब्दिक हल्लाबोल होताना दिसून येत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केले जात आहे. तर, भुजबळ हेही जरांगे पाटलांवर थेट प्रहार करताना दिसून येतात.

दरम्यान, भुजबळ यांच्या नेतृत्वात जालन्यातील अंबड येथे ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला होता. आता, अंबडनंतर हिंगोली जिल्ह्यात ओबीसी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, छगन भुजबळ यांची हिंगोली येथील सभा उधळून लावण्याचा इशाराही मराठा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे हिंगोली येथील महाएल्गार मेळाव्याला जाण्यासाठी नांदेड विमानतळ येथून बाहेर पडल्यावर मराठा आंदोलनकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी, आंदोलकांकडून त्यांना काळे झेंडेही दाखविण्यात आले. याप्रकरणी, पोलिसांनी लगेच चार जणांना ताब्यात घेतले. स्वराज्य संघटनेने हिंगोली येथील ओबीसींचा एल्गार मेळावा उधळून टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी सकाळपासूनच विमानतळ रस्त्यावर मोठा बंदोबस्त वाढविला होता. तर, स्वराज्य संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी अगोदरच ताब्यातही घेतले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR