22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रलासलगाव बाजार समितीत लिलाव बंद; शेतकरी आक्रमक

लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद; शेतकरी आक्रमक

लासलगाव : कांद्याच्या निर्यातबंदीवरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

दरम्यान, लासलगाव बाजार समितीत शेतक-यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. दुसरीकडे एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची शेतकरी ओरड करत आहेत.

लासलगाव बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतक-यांकडून लासलगाव बाजार समितात कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. निर्यातबंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. सरकारने तातडीने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. तसेच शेतक-यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

लासलगावात कांद्याला सरासरी २१०० रुपयांचा दर
लासलगाव बाजार समितात सध्या कांद्याला सरासरी २१०० रुपयांचा दर मिळत आहे. कमीत कमी ८०० तर जास्तीत जास्त २३०४ रुपयांचा भाव मिळत आहे. कांदा निर्यातबंदी उठवावी, यासाठी बाजार समितीत शेतक-यांनी आमरण उपोषण देखील सुरू केले आहे.

कांदा खरेदी सुरू नाहीच
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याचे भाव सतत कोसळत असल्याने मनमाड येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. दुसरीकडे एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र, कांदा खरेदी होत नसल्याची ओरड शेतक-यांनी केली आहे.

सोलापूर बाजार समितीत केवळ ६०० ट्रक कांदा लिलावासाठी सोडला जाणार
सोलापूरच्या कृषि उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांदा लिलावामध्ये गोंधळ झाला होता. या गोंधळानंतर आज पुन्हा बाजार सुरू झाला आहे. कांद्याच्या लिलावासाठी बाजार समितीने नवीन नियम केले आहेत. बाजारात आता केवळ ६०० ट्रक कांदा लिलावासाठी सोडला जाणार आहे. उर्वरित कांदा गाड्यांना दुस-या दिवशीच्या लिलावासाठी टोकन नंबर देऊन पार्किंगमध्ये थांबवले जाणार आहे.

बाजारात लिलाव झालेला कांदा बाहेर पडल्याशिवाय बाहेरील गाड्या आतमध्ये सोडल्या जाणार नाहीत. बाजार समितीच्या नवीन नियमामुळे बाजारात आज कोणताही गोंधळ नाही, शिस्तबद्ध पद्धतीने बाजारात लिलाव सुरू आहेत. कांद्याचे दर देखील स्थिर आहेत. आज कांद्याला साधारण १८०० ते २२०० रुपये दर मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR