अहमदाबाद : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तसेच दोन्ही संघाच्या ‘प्लेयिंग ११’ मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारताने साखळी सामन्यांमध्ये सलग दहा सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडला हरवून भारताने अंतिम फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेला हरवून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे. तर भारताने दोनदा विश्वचषक जिंकला आहे. भारताने १९८३ आणि २०११ मध्ये वर्ल्ड कपवर कब्जा केला होता.
भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचं अनेकांना आश्चर्य वाटले. रोहित शर्माचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल यांच्याशिवाय श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत. भारताने सर्व १० सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग आठ सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली आहे. क्रिकेट विश्वात दोन्ही संघांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियन संघ
डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.