20.2 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeपरभणीसंत भगतराम जिनींगला मराठवाड्यातील सर्वोत्तम जिनींगचा पुरस्कार

संत भगतराम जिनींगला मराठवाड्यातील सर्वोत्तम जिनींगचा पुरस्कार

मानवत : शेतक-यांना योग्य भाव देणारी व नामवंत जिनींग अशी ओळख असणा-या येथील संत भगतराम जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग यांना हयात पॅलेस येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये मराठवाड्यातील सर्वोत्तम जिनिंग पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार कॉटन अशोसियन ऑफ इंडिया व महाराष्ट्र जिनस असोशिएशन यांच्या मार्फत देण्यात आला.

हा पुरस्कार स्वीकारताना उत्कृष्ट व्यापारी रामनिवास सारडा, युवा उद्योजक गोपाल विजयकुमार तोष्णीवाल, गौरव दिनेशजी लड्डा म्हणाले की, इथ पर्यंत पोचण्यासाठी अनेकांचे मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे सांगितले. डॉ.विजयकुमार तोष्णीवाल, दिनेश लड्डा, रामनिवास सारडा यांच्या कार्याचे कौतूक होत असून मिळालेल्या पुरस्काराबद्दल मानवत शहरासह संपूर्ण जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR