21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरकर्करोगाच्या उपचारावर आयुर्वेदिक वनस्पती गुणकारी ठरतील

कर्करोगाच्या उपचारावर आयुर्वेदिक वनस्पती गुणकारी ठरतील

लातूर : प्रतिनिधी
आयुर्वेदिक वनस्पतींमुळे कर्करोग रोखता येऊ शकतो. या आजाराला पायबंद घालण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती लाभदायी ठरतील, असा दावा नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे डॉ. अरुण खरात यांनी केला आहे. येथील कॉक्सिट महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी मोहालीच्या राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. अमितकुमार रॉय, डॉ. शिवराज निळे, डॉ. तानाजी कुद्रे, डॉ. महेश पाटील, डॉ. बी. एस. नागोबा, डॉ. स्रेहल जमालपुरे, ‘कॉक्सिट’चे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, संस्थेचे उपाध्यक्ष एल. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, डॉ. बी. एल. गायकवाड, जैव तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. ईश्­वर पाटील, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव, डॉ. डी. एच. महामुनी, प्रा. सुषमा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. रॉय म्हणाले, दैनंदिन कामाच्या धावपळीने मानवाच्या आहारात पौष्टिक मूलद्रव्यांची पातळी खालावली आहे. यामुळे विविध आजार तोंड वर काढत आहेत. बदलत्या जीवनशैलीनुसार मानवाने पौष्टिक मूलद्रव्यांनी युक्त घ्यावा, जैव तंत्रज्ञानाचा वापर करून शरीरातील आवश्यक अन्नाचे मूलद्रव्ये भरून काढता येऊ शकतात. धावपळीच्या दिनचर्येतही जैव तंत्रज्ञानातून ती कमी पूर्ण करून निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. पाटील म्हणाले, जैव तंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक कार्यशाळा होणे गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांत वाढ होऊन वैचारिक पातळी वाढते. अशा कार्यशाळांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी संशोधन करावे, त्यातून स्वत:चाही विकास साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यशाळेत डॉ. निळे, प्राचार्य डॉ. झुल्पे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. पाटील यांनी केले. कार्यशाळेचा २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR