पुणे : पेट्रोलच्या किंमती वाढत असताना लोक सातत्याने त्यासाठी पर्याय शोधत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र रेंज आणि बॅटरीची किंमत यामुळे बरेच लोक त्याकडे पाठ फिरवतात. अशातच बजाजने या दोन्ही समस्यांवर उपाय उपलब्ध केला आहे. लवकरच बजाजच्या चेतक स्कूटरचे सीएनजी व्हर्जन लाँच होणार आहे.
बजाजच्या या स्कूटरबाबत राजीव बजाज यांनी २००८ सालीच भाष्य केले होते. ते म्हणाले होते, की कंपनी अशा एका स्कूटरवर काम करत आहे, ज्यामध्ये ड्युअल इंजिन व्हेरियंट उपलब्ध केले जाईल. अखेर आता इतक्या वर्षांनंतर चेतक सीएनजीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
डिजिटल आणि मॉडर्न
काळानुरूप आपल्या चेतक या स्कूटरमध्ये बजाजने मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. इलेक्ट्रिकचा जमाना सुरू झाल्यानंतर कंपनीने चेतक इलेक्ट्रिक देखील लाँच केली होती. आता कंपनी सीएनजी व्हेरियंटवर काम करत आहे. हे मॉडेल अगदी डिजिटल आणि मॉडर्न असणार आहे.