40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअखंड भारताचे स्वप्न पाहणा-या भारत सुपुत्राचा गौरव

अखंड भारताचे स्वप्न पाहणा-या भारत सुपुत्राचा गौरव

मुख्यमंत्री शिंदेंनी केले अडवाणी यांचे अभिनंदन

मुंबई : अखंड भारताचे स्वप्न पाहणा-या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

‘प्रखर राष्ट्रभक्त अशा ज्येष्ठ नेते अडवाणीजी यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी समर्पित केले आहे. अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राचे मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, रथयात्रेचे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहेत.

देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आदरणीय आहे. उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंददायी बाब आहे. त्यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, असे अभीष्टचिंतन करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कारासाठी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR